जळगाव : शहरातील पांडे डेअरी येथील डॉ. अॅन्ड रेव्ह. फ्रेड विल्यम शिलॅडर मेमोरिल अलायन्स चर्च येथे आज 25 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता फार रेव्हे शशिकांत वळवी यांच्या उपस्थितीत प्रार्थना व उपासनेस सुरूवात करण्यात आली. सुरूवातीलस ख्रिस्ती बांधवांनी ख्रिसमस कॅरर्ल्स म्हणजेच नाताळ गीते गाईली. यात प्रामख्याने युवकसंघ व लहान बालके यांचा सहभाग होता. त्यानंतर नाताळ संबंधातील शास्त्रपाठ म्हणजे बायबल वाचन व विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली.
फादर्सने केले मार्गदर्शन
सदरप्रसंगी फादर रेव्हे. शशिकांत एम.वळवी यांनी आपल्या प्रवचणात सांगितले की, येशून शांतीचा अधिपी होता. सुमारे दोन हजार वर्षापुर्वी सर्व मानवजातीस शांती मिळावी यासाठी तारण प्राप्त व्हावे यासाठी बेथलेहेम गावी गायीच्या गोठ्यात येशूचा जन्म झाला होता. येशूची शिकवण ही सर्वस मानवासाठी आहे. त्याच्या शिकवणी नुसार आचरण केल्यास मनाला शांती मिळते. आज कुटूंबाला, समाजाला व राष्ट्राला शांतीची गरज आहे. येशूने जगात शांतता नांदावी म्हणून या भूतलावर जन्म घेतला तो शांतीदूत होता, मनूष्याला पापापासून मुक्त करण्यासाठी व जगाला प्रेम, दया, क्षमा व शांतीची शिकवण देण्यासाठी येशूचा या जगात आला होता. उपासनेनंतर सर्व ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. सदर नाताळ उत्सवात शहरातील ख्रिस्ती समाज बहुसंख्येने उपस्थित होता. नाताळ उत्साव यशस्वीतेसाठी चर्चपंप कार्यकारिणी, अलायन्स चर्च महिला मंडळ, प्रकाश युवक संघ व बालगोपालांचे संन्डेस्कूल यांचे सहकार्य लाभले.
मेमोरिल अलायन्स चर्चचा इतिहास
पांडे डेअरी चौक येथील डॉ. अॅन्ड रेव्ह. फ्रेड विल्यम विल्यम शिलॅडर मेमोरिल अलायन्स चर्च येथे ख्रिस्ती बांधवांचा नाताळ सण उत्साहात पार पडले. सदर चर्च हे शहरातील सर्वात जूने चर्च आहे. त्याची स्थापना 1925 मध्ये झाली असून पांडे डेअरी चौकात असलेल्या या चर्चची नवीन वास्तू 1998 मध्ये बांधण्यात आली आहे. सध्या सुमारे 350 सभासद असून सदर चर्च हे शतकाकडे वाटचाल करीत आहे. या चर्चची जबाबदारी फादर रेव्हे. शशिकांत एम.वळवी हे संभाळत आहेत.