मेरीकोम महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत

0

नवी दिल्ली : पाच वेळा विश्व चॅम्पियनचा किताब मिळविलेल्या बॉक्सर एम. सी. मेरीकोम (४८ किलो) दहाव्या महिला विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मेरीने उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किंग हँग मीवर विजय मिळवत अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे. उपांत्य फेरीत मेरीने किंग हँग मी हिच्यावर 5-0 असा विजय मिळवला. यापूर्वी पाच वेळा मेरीने जगज्जेतेपद पटकावले आहे.