मुंबई । कॉलिन अब्रांचेसने नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर मेरीलॅड युनायटेड संघाने दुसर्या बोरीवली प्रिमीअर लीगमधील पाच फेरीच्या सामन्यात मिलान क्लबचा 1-0 असा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासून खेळावर पकड मिळवताना कॉलिनने मिळालेल्या संधीचा फायदा उचलत संघाला आघाडीवर नेणारा गोल झळकवला. त्यानंतर उभय संघाच्या खेळाडूंनी सामन्यात वर्चस्व मिळवण्यासाठी आक्रमक चाली रचल्या.
पण नंतरच्या खेळात दोन्ही संघानी चांगला बचाव केल्याने कॉलीनचा गोल सामन्यात निर्णायक ठरला. सामन्यात बचाव अभेद्य राखणार्या मेरीलँडचा गोलरक्षक कार्तिक पुत्रनला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बीग बॉस प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. डॅनी जॉनने प्रत्येकी एक गोल करत फायर ड्रेगन संघाला चॅलेंजर्स फुटबॉल क्लबवर 2-1 असा विजय मिळवून दिला.