मेरी कोमचे आव्हान संपुष्टात; कांस्य पदकावर समाधानी !

0

नवी दिल्ली: भारताची आघाडीची महिली बॉक्सर मेरी कोमचे जागतिक महिला अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेतील उपांत्य फेरीत पराभव झाल्याने आव्हान संपुष्टात आले आहे. पराभवासह मेरीला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. तुर्कीच्या युरोपियन चॅम्पियन बुसेनाझ काकिरोग्लूने मेरीचा 4-1 ने पराभव केला.

स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागल्याने सहावेळा जागतिक विजेती मेरी कोममहिला जागतिक बॉक्सिंग चँपियनशिपमधून बाहेर पडली आहे.