मुंबई : 1985 मध्ये प्रदर्शित झालेला ‘मेरी जंग’ या चित्रपटाने आपले आयुष्य बदलले असे ट्विट अभिनेता अनिल कपूर यांनी केले असून प्रसिद्ध गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर आणि चित्रपट निर्माते, दिग्दर्शक सुभाष घई यांना चित्रपटात काम करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद म्हंटले आहे.
Do you remember the exact moment your life changed? That for me was when I signed #MeriJung! This movie led to me marrying my wife & embarking on an incredible journey! Thanks @Javedakhtarjadu for believing in me & @SubhashGhai1 for giving me the opportunity of a lifetime! https://t.co/ge1qOzWG8s
— Anil Kapoor (@AnilKapoor) October 11, 2018
अनिल कपूर यांनी ट्विट केले आहे की, तुम्हाला माहित आहे का आयुष्य बदलणारा क्षण कोणता आहे? माझ्यासाठी हा क्षण होता की मी ‘मेरी जंग’वर स्वाक्षरी केली होती. या चित्रपटा नंतर मला माझी पत्नी मिळाली आणि एक अतुलनीय प्रवास सुरू झाला. माझ्यावर विश्वास दाखवण्यासाठी जावेद अख्तर आणि मला जीवनात सर्वात मोठी संधी देण्यासाठी सुभाष घई यांचे धन्यवाद. या चित्रपटात मीनाक्षी शेषाद्री, नुतन, अमरीश पुरी आणि जावेद जाफरी यांचा समावेश होता. अनिल कपूर लवकरच ‘टोटल धमाल’ आणि ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ मध्ये दिसेल.