नवापुर। शहरातील टाऊल हॉल येथे सुलभ पीक कर्ज अभियान अंतर्गत कृषी कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. शासनाने केलेल्या कर्ज माफीच्या निर्णयाची माहीती शेतकर्यांना देण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र शासनाने कर्ज माफी संदर्भात दररोज नवनविन अध्यादेश जाहीर करत शेतकर्यांची फसवणूक करत असल्याने शेतकर्यांनी मेळाव्यात नाराजी व्यक्त केली. सभा संपल्यानंतर शेतकर्यांनी शासन आदेशाच्या परिपत्रकाची होळी करत विरोध दर्शविला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावीत यांनी व्यासपीठावर न जाता शेतकर्यांमध्ये बसून शासनाचा निषेध करत विरोध केला. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचा अध्यक्षा रजनी नाईक होत्या. आमदार सुरुपसिंग नाईक, माजी खासदार माणिकराव गावीत, जिल्हाधिकारी डाँ. मल्लिनाथ कलशेट्टी, नगराध्यक्षा रेणुका गावीत, पंचायत समिती सभापती सविता गावीत, जिल्हा उपनिबंधक एस.वाय.पुरी, प्रताप पाडवी, तहसिलदार प्रमोद वसावे, कृषी अधिकारी वसंत चौधरी, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर उपस्थित होते.
शेतकर्यांची अडवणूक करु नका
शासनाने अल्पभुधारक शेतकर्यांना तातडीने दहा हजार रुपयाची मदत कर्ज स्वरुपात जाहीर करण्याच्या निर्णय घेतला आहे. कोणत्याही शेतकर्यांची कर्ज पुरवठा करतांना अडवणूक करु नये असे आदेश जिल्हाधिकारी कलशेट्टी यांनी दिले. शेत तळ्याना चांगला प्रतिसाद मिळत असून नरेगामध्ये फळबाग लागवड करा. तसेच प्रत्येक शेतकर्यांनी शेताचा बांधावर वृक्षलागवड करावे असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी 5 गावे दत्तक घेतले आहे ते गावे जलयुक्त शिवार मध्ये समावेश करण्यात येतील असल्याचे सांगितले.
दहा हजाराची मदत कागदावर
शासनाने 10 हजार रुपये तातडीचे कर्ज देण्याचे जाहीर केले आहे. पंरतु आज पर्यत महाराष्ट्र राज्यामध्ये एकाही शेतकर्यांला 10 हजार रुपयाचे कर्ज उपलब्ध झालेले नाही. शपथ पत्राचा मसुदा तयार केलेला आहे. त्यामध्ये जाचक अटी टाकण्यात आल्या असून शेतकर्यांची फसवेगीरी होत आहे. नवापुर तसलुक्यातील प्रतापुर येथील विनायक ठगण्या गावीत याला 18 हजार रुपयाचा धनादेश अदा करण्यात आला, पंरतु विनायक गावीत यांनी नियमीत पणे कर्ज भरणा केला असल्याने त्यांना मुख्यमंत्र्याने जाहीर केलेले 10 हजाराचे कर्ज अदा करण्यात आले असल्याचे दाखविण्यात आले आहे.
कर्जमाफीवरुन संभ्रमावस्था
शासनाने कर्जमाफी जाहीर केली आहे. कर्जमाफीनंतर तातडीने नवीन कर्ज वाटपाचे देखील आदेश दिले आहे. मात्र 7/12 कोरा झाल्याशिवाय नवीन कर्ज वाटप कसे धशक्य असल्याचा प्रश्न उपस्थित करत कर्जमाफीवरुन संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे सांगत आहे. बँका 7/12 कोरा झाल्याशिवाय कर्ज देणार नाही. मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांची फसवनुक करु नये अशी अपेक्षा शेतकर्यांनी व्यक्त केली.