नवी मुंबई : शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी सिडको गेस्ट हाऊसमध्ये एमएसईबी अधिकार्यांना ग्राहकांच्या तक्रारींची नोंद घेण्यासाठी ग्राहक मेळावा घेण्याच्या सुचना दिल्याने बुधवारी तुर्भे एमआयडीसी परिसरातील इंदिरानगर, बगाडे, गणपती पाडा, बोनसारी गाव, चुनाभट्टी कॉरी,आंबेडकर नगर, गणेश नगर, हनुमान नगर या ठिकाणी मेळावे घेण्यात आले. या वेळी तुर्भे विभागामधील नागरिकांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या.
यावेळी वाशीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंताराठोड, सहाय्यक अभियंता राऊत उपस्थित होते. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन राजन विचारे यांनी ग्राहक मेळावे घेण्याचे सूचित केल्याने अनेकांच्या विजबाबत समस्या यावेळी मार्गी लागल्या.अशी माहिती शाखाप्रमुख महेश कोठीवले यांनी दिली.