पिंपरी- नवरा-बायकोची किरकोळ कारणांवरून भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून भावाने त्याच्या मित्रासह मिळून बहिणीच्या पतीला मारहाण केली. यामध्ये बहिणीच्या पतीचा मेव्हण्याने दात पाडला. ही घटना रविवारी इंद्रायणीनगर येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. राहुल कन्हैया लालबेक (रा. घोरपडीगाव), अमित विजयसिंग पारसा (रा. ताडीवाला रोड, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दीपक भरत परमार (वय 37, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी दीपक आ णि त्यांच्या बायकोची कौटुंबिक किरकोळ कारणांवरून भांडण झाले. या भांडणाबाबत माहिती मिळाल्यानंतर पत्नीचा भाऊ राहुल याने त्याच्या अमित या मित्रासह दीपक यांना शिवीगाळ करत प्लास्टिकच्या पाईपने मारहाण केली. या मारामारीत दीपक यांचा एक दात पडला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.