मेस्सीच्या हॅट्ट्रिकमुळे बार्सिलोना विजयी!

0

माद्रिद । स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने केलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर बार्सिलोनाने अस्पानयोलचा 5-0 असा दणदणित पराभव करत ला लीगा फुटबॉल स्पर्धेत दोन गुणांनी आघाडी मिळवली आहे. अन्य लढतीत रेआल माद्रिदला निलंबित असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गैरहजेरीची किंमत चुकवावी लागली. याशिवाय गॅरेथ बेलने गोल करण्याच्या अनेक संधी दवडल्यामुळे रेआल माद्रिदने गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर असलेल्या लेवांते संघाला 1-1 असे बरोबरीत रोखले.

मैदानाबाहेरील समस्यांचा कुठलाही परिणाम बार्सिलोनाने सामन्यादरम्यान जाणवू दिला नाही. बर्सिलोनाने याआधीचे तिन्ही सामने जिंकून 9 गुणांसह आघाडी मिळवली आहे. याशिवाय पावलो हेन्रिक गांसो, विसाम बॅन येदेर आणि नोलितोने केलेल्या प्रत्येकी एक गोलामुळे सॅव्हिला फुटबॉल क्लबने एबारचा 3-0 चा पराभव करत सात गुणांसह दुसर्‍या स्थानावर झेप घेतली. रेआल माद्रिदचे तीन सामन्यांमधून पाच गुण झाले आहेत.