मेस्सीवर फिफाने लादली चार सामन्यांची बंद

0

ब्यूनस आयर्स । 2108 च्या विश्वचषकासाठी सुरू असलेल्या पात्रता फेरी सामन्यातील रेफरींशी गैरवर्तुणूक केली.त्यामुळे अर्जेटीना फुटबॉल संघाचा कर्णधार व स्टार स्ट्रायकर लायनल मेस्सीवर फिफाने चार सामन्याने खेळण्याची बंदी घातली आहे. सध्या 2018 च्या फुटबॉल विश्वचषकासाठी पात्रता फेरीतील सामने सुरु आहेत. यातीलच अर्जेंटीना आणि चिली यांच्या दरम्यान 23 मार्च 2017 रोजी सामना झाला.

या सामन्या दरम्यान मेस्सीने सहाय्यक रेफरींसोबत गैरवर्तुणूक करत, अपशब्दांचा वापर केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन फिफा अनुशासन समितीने मेस्सीवर चार सामन्यांची बंदी घातली. त्याला 10 हजार स्विस फ्रँक म्हणजे 6 लाख 50 हजाराचा दंड ही ठोठावला आहे.पात्रता फेरीतील सामन्यांच्या गुणतालिकेत अर्जेंटीनाचा संघ तिसर्‍या स्थानावर आहे. मेस्सीच्या चार सामन्यात बाहेर राहण्याने 2018 मध्ये रशियात होणार्‍या विश्वचषकासाठी अर्जेंटीना आपले स्थान बळकट करावे लागेल.