संतोष बारसे यांची माहिती ; समाजाच्या विविध प्रश्नांवर होणार अधिवेशनात चर्चा
भुसावळ- भुसावळ येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवार, 21 रोजी दुपारी एक वाजता येत असून जामनेर रोडवरील टीव्ही टॉवर मैदानावर होत असलेल्या मेहतर वाल्मीक समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनालाही ते हजेरी लावणार असल्याची माहिती नगरसेविका सोनी बारसे व माजी नगरसेवक संतोष बारसे यांनी दिली. समाजाच्या मेळाव्यात विविध प्रश्नांवर चर्चा होणार असून समाजबांधवांतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदनही देण्यात येणार आहे. राज्यभरातून या मेळाव्याला सुमारे 25 हजारांवर समाजबांधव येण्याची शक्यता असून त्या दृष्टीने आयोजकांकडून तयारी केली जात आहे. या मेळाव्याला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे देखील हजेरी लावणार आहेत. दरम्यान, अधिवेशन यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक संतोष बारसे, राजू खरारे, राजू छगन टाक, सुनील पवार, रामा जेधे, रूपसिंग पथरोड, रायसिंग पंडित यांच्यासह सर्व कृती समिती सदस्य परीश्रम घेत आहेत.