जळगाव: मेहतर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व राज्यस्तरीय युवक-युवती परिचय मेळावा मेहतर समाज शिक्षण प्रसारक व बहुउद्देशिय मंडळातर्फे आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही कार्यक्रम २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होईल़ ३० सप्टेंबर पर्यंत पालकांनी आपल्या मुलांचा बायोडाटा व नोंदणी करण्याचे आवाहन हरिश धंजे यांनी केले आहे.