मेहतर समाजाने संघटीत व्हावे : संतोष बारसे

0

भुसावळात भगवान गोगादेव नवमीनिमित्त बैठक

भुसावळ- आगामी भगवान गोगादेवजी नवमी निमित्त मेहतर समाजाने संघटीत होऊन एकतेचे दर्शन घडवावे असे प्रतिपादन मेहतर समाजाचे युवा नेते तथा माजी नगरसेवक संतोष बारसे यांनी केले ते आज दि. 10 ऑगस्ट रोजी वाल्मिक नगरात गोगादेवजी नवमीनिमित्त आयोजित बैठकीत बोलत होते.

संस्मरणीय छडी मिरवणूक काढणार
भुसावळकरांना कायम स्मरणात रहावी अशी छडी मिरवणूक काढण्यात येईल. सर्वत्र मार्गावर रोषणाई व शुभेच्छांचे बॅनर लावण्यात येतील. असंघटीत पणे 12 छड्यांची मिरवणूक न काढता सर्वांनी एकत्र मिरवणूक काढाववी. घरी स्वत:साठी किंवा पाहूण्यांसाठी स्वयंपाक महिलांनी न करता छडीत सहभागी होता यावे म्हणून सुमारे 5 हजार लोकांचा महाभंडारा आयोजित करण्यात येईल. मोहरम व गुरुनानक जयंती मिरवणूकीचा आदर्श घेऊन त्या दिवशी मद्य प्राशन टाळावे, तसेच तन, मन, धनाने सहकार्य करावे असे संतोष बारसे यांनी स्पष्ट केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी विद्यमान अध्यक्ष गब्बर चावरिया यांनी समिती अध्यक्षपदी पुनश्च निवडीऐवजी नवीन समाज बांधवांकडे ही जबाबदारी देण्याचे सांगितल्याने सर्व संमीने नुतन अध्यक्षपदी अमित खरारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या बैठकीस रामा जैधे, भुरा कंठेरे, कपील जमदार, किशोर डागोर, जग्गु चावरिया, श्रीकृष्ण जावळे, भैय्या संगेले, मांगीलाल पंडीत, सुनिल पवार, शंकर करोसिया, राजू पंडीत, दिपक बारसे, कमल पथरोड, शुभम उज्जैनवाल, प्रविण पंडीत, सागर जेधे, अमर बागरे, छोटू धामणे, कल्लू ढिक्क्याव, किसन पटाने उपस्थित होते.