मेहरगाव-देवभानेसाठी 12 कोटी

0

शिरपूर। तालुक्यातून अक्कलपाडा धरणातील अतिरिक्त पाणी डाव्या कालव्यातून सोडावे, या करीता मागील वर्षी शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले होते. आंदोलनास हिंसात्मक वळण लागल्याने पोलिसांकडून शेतकर्‍यांना मारहाण करण्यात आली. जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी शेतकर्‍यांच्या अडचणी व मागण्या समजवून घेतल्या. एक वर्षाच्या आत आपल्या कॅनॉलचे काम पूर्ण केले जाईल असे आश्‍वासन दिले होते. कामाच्या पूर्ततेची जबाबदारी मंत्री ना. महाजन यांनी आमदार अनिल गोटे यांच्यावर सोपवली होती. त्यानुसार मेहरगाव ते देवभाने कालव्यासाठी 12 कोटी रूपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आमदार अनिल गोटे यांनी दिली.

सर्वेक्षणासाठी 10 लाख रूपये उपलब्ध
डावा कालवा 29 कि.मी.लांब असून अक्कलपाडा धरणातील अतिरिक्त पाणी नैसर्गिक उताराने देवभाने, धरणामध्ये पोहोचेल. 25-30 चा कालवा नाल्यामध्ये पाणी सोडल्यानंतर हे पाणी भात नदीमध्ये जाईल व देवभाने धरण भात नदीवर बांधलेले आहे. सदर धरण गेल्या 30 वर्षात आजपर्यंत केवळ तीन वेळाच पूर्ण क्षमतेने भरले. बहुतेक वेळी 55 टक्के ते 60 टक्के पाण्याचा साठा देवभाने धरणात होऊ शकला. मेहरगाव येथून कॅनॉल केल्यास देवभाने धरण पूर्ण भरु शकेल. पांझरा नदीच्या पुराचे पाणी सोनवद प्रकल्पात टाकून सोनवद प्रकल्प पाणी साठविण्यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु दिवसागणीक पर्जन्यमान कमी होत असल्यामुळे पांझरा नदीलाही फारसे पुराचे पाणी येत नाही. मेहरगाव जवळ कॅनॉल केल्याने देवभाने धरणाच्या खालच्या बाजूस असलेल्या सोनवद प्रकल्पातही पाणी साठवता येईल. नव्या कॅनॉलसाठी 12 कोटी रुपये एवढा निधी लागणार आहे. या सर्वेक्षणासाठी जिल्हा नियोजन मंडळात 10 लक्ष रुपये उपलब्ध करुन देण्यात आले होते. निरनिराळ्या स्तरावरील मान्यता निविदा प्रक्रिया इत्यादी सोपस्कारात एक महिन्यापेक्षा कितीही कालावधी लागू शकतो. आपणास विनंती की, मेहरगाव येथे नव्याने कराव्याच्या एक्सप्रेस कॅनॉल फेज-2 च्या क ामासाठी नदी जोड प्रकल्प जलसंपदा विभागाकडून 12 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यासंबंधी आदेश झाले आहेत.

देवभाणे धरण पुर्ण भरल्यास यांना होणार फायदा
देवभाणे धरण पुर्ण क्षमतेने भरल्यास रामनगर, तीसगांव, वडेल, ढंढाणे, सायणे, नंदाणे, देवभाणे, कापडणे, धनुर, सरवड या गावाचा मुबलक पाठीसाठा निर्माण होवून शेतकर्‍यांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आंदोलनाची दखल जलसंपदामंत्री ना.गिरीष महाजन यांनी तातडीने घेत वर्षभरात मेहेरगांव पासून देवभाण्यापर्यंत 29 कि.मी.पर्यंतच्या कॅनोलचे काम पूर्ण केले जाणार आहे. पुढील महिन्यात निविदा प्रकाशित करुन कामास प्रारंभ केला जाईल.

कालवा म्हणजे संजिवनी
नोव्हेंबरमध्ये काम पुर्ण झाल्यानंतर धुळे तालुक्यातील बर्‍याचशा गावांना फायदाच होणार आहे. शेतकर्‍यांना हा कालवा संजीवनी ठरेल यात शंका नसल्याचे देखील आमदार अनिल गोटे यांनी सांगितले. सदर कॅनॉलमुळे मेहरगाव, देवभाने, कावठी, निमडाळे, गोंदूर, वलवाडी, चिचगाव, ढंढाणे, वडेल या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी मार्गी लागेल. बारमाही पिकांसाठी सुद्धा पाण्याचा उपयोग होऊ शकेल. शेतकर्‍यांच्या विहिरींना सुद्धा कायम स्वरुपी बागयतीसाठी पाणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर कॅनॉलचे काम नोव्हेंबर महिन्यात सुरु करुन मार्चपर्यंत पूर्ण करावेत असे आदेश जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी दिले.