मुंबई । इंडियन टेरीन चॅम्पियन स्पोर्टिव्ह सिरीज अंर्तगत आठ शहरांमध्ये आयोजित केलेल्या सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेतील मुंबई विभागीय स्पर्धेतील ९२ किलोमीटर अंतराच्या शर्यतीत पुरुषांमध्ये मेहरझाद इराणी आणि महिलांमध्ये लक्श्मी थांगडदुराईने बाजी मारली. पहाटे ४.४५ वाजता सुरु झालेल्या या शर्यतीचे ९२ किलोमीटरचे अंतर मेहरझादने २ तास ३० मिनीटांमध्ये पूर्ण केले.
तर त्यापाठोपाठ अवघ्या एक मिनीटांच्या फरकाने धिरेन बोंत्राने (२ तास ३१ मिनीटे) दुसरे स्थान मिळवले. तर धिरेनच्या तुलनेत काही शतांश सेकंदाच्या फरकाने मागे पडलेल्या अक्शय मोयेला तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
पुरुषांच्या तुलनेत महिलांंमध्ये मात्र फारशी चुरस पहायला मिळाली नाही.पहिले स्थान मिळवणार्या लक्श्मीने ९२ किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी ३ तास ९ मिनीटे एवढा वेळ घेतला. त्यानंतर तब्बल १८ मिनिटांनी स्वाती सबलोकने ३ तास २७ मिनिटांमध्ये शर्यत पूर्ण करुन दुसरे स्थान मिळवले.
तिसर्या स्थानावर राहिलेल्या नंदीनी शर्माने ३ तास ४४ मिनीटे अशी कामगिरी साधली. या स्पर्धेतील पुढील शर्यत २४ सप्टेंबर रोजी पुणे येथे होणार आहे.