मेहरुणचा लाचखोर सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

0

वीज मिटरचे सील तुटल्याने तडजोडीसाठी मागितली 12 हजारांची लाच

जळगाव – ग्राहकाच्या वीज मिटरचे सील तुटल्याने दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी 12 हजारांची लाच घेणार्‍या मेहरुण येथील सहाय्यक अभियंता संदीप रणछोड बडगुजर (48, रा. पार्वती नगर, रजनी अपार्टमेंट, जळगाव) यास बुधवारी सायंकाळी जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.

कारवाई टाळण्यासाठी मागितली लाच
जळगाव शहरातील 29 वर्षीय तक्रारदाराच्या घरातील वीज मिटरचे सील तुटल्याने त्यापोटी 40 ते 50 हजार रुपये दंड भरावा लागेल, असे सांगत दंड भरायचा नसल्यास त्या मोबदल्यात 15 हजारांची लाच आरोपी बडगुजर यांनी मागितली होती. 12 हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जी.एम.ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आलेल्या सापळ्यात आरोपीला रंगेहाथ अटक करण्यात आली.