Jalgaon University contract worker’s murder: Body found in decomposed state जळगाव : मेहरुण येथील रहिवासी व जळगाव विद्यापीठातील कंत्राटी कर्मचारी असेल्या तरुणाचा खून झाल्याची बाब उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. प्रमोद उर्फ भूषण सुरेश शेट्टी (33, रा. मेहरूण)असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या दोन दिवसांपासून भूषण हा तरुण बेपत्ता होता मात्र त्याचा अखेर त्याचा मृतदेहच हाती लागला आहे.
महादेव मंदिरानजीक आढळला मृतदेह
प्रमोद उर्फ भूषण हा तरुण जळगाव विद्यापीठात कंत्राटी कर्मचारी म्हणून कामास होता. शनिवारी दुपारपासून तो बेपत्ता असतानाच त्याचा शोध सुरू होता मात्र सोमवारी दुपारी गिरणा नदीजवळील महादेव मंदिराच्या खालील बाजूस त्याचा मृतदेह आढळला. प्रमोदचा खून करून मृतदेह फेकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
धारदार शस्त्राने केला हल्ला
मयत प्रमोदच्या गळ्यावर आणि हातवार धारदार शस्त्राने वार केल्याची प्राथमिक माहिती आहे तर खून झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली आहेत.