जळगाव – मेहरुण तलाव परिसरातील उद्यानामधील एका मोठ्या विहिरीत 24 वर्षीय तरुणाने रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उडी घेतली. हा प्रकार परिसरातील काही जणांच्या लक्षात आल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पट्टीचे पोहणारे या तरुणाचा विहिरीत शोध घेत आहे . मेहरुण परिसरामधील अशोक किराणा परिसरातील इम्रान खान अकील खान असे तरुणाचे नाव असल्याचे सांगण्यात येते. याप्रसंगी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. हा तरुण डोकेदुखीच्या आजाराने त्रस्त होता. त्याने या त्रासाला कंटाळून विहिरीत उडी घेतल्याचे सांगण्यात येते.