जळगाव-शहरातील पर्यटनस्थळ असलेल्या मेहरुण तलावाच्या बंधार्याला काही ठिकाणी तडे गेले असल्याचे मनपा प्रशासनाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे तलावाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान, खबरदारी म्हणून तलावाच्या बंधार्याचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यासाठी मनपाने पाटबंधारे विभागाला पत्र दिले आहे.
शहराचे सौंदर्य असलेल्या मेहरुण तलावाचा बंधारा 1870 मध्ये तयार केल्याची प्रशासनाच्या दप्तरी नोंद आहे. बंधार्याला 150 वर्ष झाले असून हा बंधारा पुर्णपणे मातीने बांधण्यात आला आहे. सहा वर्षापुर्वी जेव्हा तलावातून गाळ काढून खोलीकरण करण्यात आले. त्यावेळी या बंधार्याला पिचिंग करुन बंधारा मजबूत करण्यात आला होता. मात्र आता पाण्याची पातळी वाढत असल्याने बंधार्याला तडे गेले आहेत. भविष्यात कोणतीही दुर्घटना होवू नये यासाठी मनपा प्रशासनाने बंधार्याचे ऑडीट करण्याबाबत पाटबंधारे विभागाला पत्र दिल्याची माहिती शहर अभियंता सुनील भोळे यांनी दिली.