जळगाव। बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे 5 विद्यार्थी शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास मेहरूण तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी दोघांना पोहता येत नसल्याने दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास पाण्यात बुडून करूण अंत झाला. मेहरूणमधील पट्टीच्या पोहणार्यांनी दोन तास अथक प्रयत्न केल्यानंतर 5.30 वाजेच्या सुमारास त्यांचे मृतदेह सापडले.
बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी भूषण प्रकाश पाटील (वय 20 , रा. सुरत), निखील विजय पाटील (वय 21, रा. नंदुरबार), मयूर लोटन गोसावी (वय 19, रा. धुळे), चैतन्य पटेल (वय 19, रा. नंदुरबार), अंकूर दिलीप सूर्यवंशी (वय 19, रा. जळगाव) हे शनिवारी सुटी असल्याने पोहण्यासाठी मेहरूण तलावात गेले होते. जॉगिंग ट्रॅकवर असलेल्या फार्म हाऊसच्या समोरून ते पाचही विद्यार्थी तलावात उतरले. पाण्यातून काही अंतर चालून गेल्यानंतर टेकडीवर त्यांनी कपडे काढले. त्यानंतर काहीजण पाण्यात उतरले. तर काही काठावर बसलेले होते. भूषण पाटील,निखील पाटील हे खोल पाण्यात गेले. त्या ठिकाणी गाळ होता. त्यात दोघांचे पाय फसले. त्यामुळे दोघे पाण्यात ओढले जात होते. त्यांनी जीवाच्या अकांताने बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काठावर बसलेले त्यांचे मित्र त्यांना ‘बस थोडेच अंतर राहिले’… असे ओरडून पुढे बोलवत होते. त्यापैकी एकानेही त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला नाही. अशी माहिती प्रत्यक्ष दर्क्षीनी दिली.
गंमत करीत असल्याचे वाटले…
घटना घडली त्यावेळी तलावाच्या आजुबाजुला काम करीत असलेल्या तरूणांना वाटले हे विद्यार्थी गंमत करीत असल्याचे वाटले. त्यामुळे अगोदर त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. मात्र काही मिनिटानंतर दोघे बुडत असल्याचे समजल्यावर ते तरूण धावत आले. मात्र घटनास्थळापर्यंत पोहचण्या पुर्वीच दोघे बुडाले होते. ते गाळात फसल्याने त्यांना काढणे शक्य झाले नाही. मात्र बुडणार्यांच्या मित्रांनी प्रयत्न केले असते तर वाचले असते. असे त्या तरूणांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
दोन तासानंतर सापडले मृतदेह…
उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील कुराडे, सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील, उप निरीक्षक एन. बी. सूर्यवंशी, बाळकृष्ण पाटील, शरद भालेराव हे तत्काल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सोबत मेहरूण मधील विनोद चाटे, समाधान नाथ या पट्टीच्या पोहणार्यांना सोबत आणले होते. त्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळावर पोहोचले. गाळ असल्याने त्यांनी काढणे कठीण जात होते. त्यामुळे महापालिकेचा गळ आणल्यानंतर शोध पुन्हा शोध सुरू केला. दोन तासानंतर काही अंतरावर दोघांचे मृतदेह सापडले.
पोलिस अधिकार्यारी घटनास्थळी
मेहरुण तलावावर दोन तरुण बुडाल्याची माहिती कळताच सहाय्यक निरीक्षक समाधान पाटील, उपनिरीक्षक एन.बी.सुर्यवंशी,कर्मचारी बाळू पाटील, शरद भालेराव सोबत पोहणाराच घेवुन पोचले. मेहुरुण मधुन इतर पोहणार्यांना पचारण करण्यात आले, त्यात नेहमीचा पट्टीचा पोहणारा रविंद्र गवळी,नजिर शेख रहेमान ,शेखर सोनवणे, विठ्ठल हटकर, विनोद चाटे, अमोल लाडवंजारी एकनाथ वाघ, विजय शिंदे वाघ यांनी शोध अडीच तास शोध मोहीम राबवल्यावर एकाचा मृतदेह गळाला लागला मात्र काढता आला नाही म्हणुन गळ(बिलईची) व दोरखंड मागवण्यात आला. घटनेची माहिती मिळताच डिवायएसपी सचिन सांगळे घटनास्थळी पोहोचले.
अग्निशामक दल आले उशिरा
महापालीकेच्या अग्निशामक दलातील कर्मचारी सुनील कोल्हे,सुनील मोरे, रविंद्र बोरसे, रज्जाक खान कादर खान आदी त्यांची छोटी टेंम्पोकार मध्ये पोहण्याचे साहित्य, ट्युब, दोरखंड आदी सामुग्री घेवुन पावणे सहाच्या सुमारास तलावावर पोहचले. मात्र तत्पुर्वीच आठ-दहा पोहणार्या तरुणांच्या टिमने बुडालेल्या दोघा तरुणांना बाहेर काढल्याने. तलावा जवळील जॉगींग ट्रॅकच्या खाली उतरण्याची संधीही त्यांना मिळाली नाही.