मेहरुण परिसरातील १२ पैकी ९ घरांमध्ये आढळले डेंग्यूचे डास

0

जळगाव: शहरात साथ राेगांच्या पार्श्वभूमीवर महापालिका अाराेग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी मेहरुणमध्ये घरात जाऊन पाहणी केली. १२ पैकी ९ घरात डेंग्यूचे डास व घरात साठवलेल्या पाण्यात डासांच्या अाळ्या अाढळून अाल्या अाहेत. तसेच या परिसरात चार डेंग्यूसदृश रुग्ण अाढळून अाले. यातील तीन जणांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समाेर येत अाहे. तर महापालिकेच्या अाराेग्याधिकाऱ्यांनी डेंग्यूचा रुग्ण नसल्याचा दावा केला.

मेहरूण परिसरातील मास्टर कॉलनी, रामेश्वर कॉलनी, संत ज्ञानेश्वरनगर, साईबाबा मंदिर याभागात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याचे सामाजिक कार्यकर्ते सलिम इनामदार यांनी सांगितले. यात फैजान खान फिरोज खान यांच्यावर डॉ. राहुल महाजन यांच्या दवाखान्यात तीन दिवसापासून उपचार सुरु आहेत. चैताली पंडित नाईक, दिव्य संतोष चौधरी, मोहित गोपाल घुगे यांना डेंग्यूची लागण झालेली असून उपचार सुरू अाहेत. महापालिकेच्या मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांनी नसेमन काॅलनी परिसरातील दाेन iगल्ल्यांची तपासणी केली असता त्यातील ९ घरांमध्ये डेंग्यूचे मच्छर सापडले. या ठिकाणच्या पाणी साठ्यात त्यांनी अॅबेटिंग केले. तसेच १४ संशयित रुग्णांचे नमुने घेतले.