मेहरुण शिवारातील मालमत्ता परस्पर दुसर्‍याच्या नावे विक्री : जळगावच्या सहाय्यक दुय्यम निबंधकांसह आठ संशयीतांविरोधात गुन्हा

Sale of properties in Mehrun Shivara in favor of one another: Case against eight suspects including Assistant Sub-Registrar of Jalgaon जळगाव : शहरातील मेहरूण शिवारात असलेली मालमत्ता परस्पर दुसर्‍याच्या नावे करून विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहाय्यक दुय्यम निबंधक, मंडळ अधिकारी, तलाठ्यासह आठ संशयीतांविरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. वसंत तुकाराम भंगाळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

घरावर कब्जा करीत केली विक्री
पिंप्राळा येथील रहिवासी असलेले वसंत तुकाराम भंगाळे (74) यांच्या पत्नी मयत झाल्यावर मेहरूण शिवारातील सर्व्हे क्रमांक 21/1ब मधील 1008.33 चौ. फूट मालमत्तेत बांधलेले घर त्यांच्या नावे झाले होते. 16 जुलै 2010 ते 22 जुलै 2022 पावेतो मोहम्मद इरफान मोहम्मद तांबोळी (रा.मेहरूण) याने इतरांना सोबत घेत परस्पर मिळकतीवर कब्जा केला आणि त्याची विक्री केली. वसंत भंगाळे यांनी याप्रकरणी फसवणूक झाल्याची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दिल्याने मोहम्मद इरफान मोहम्मद तांबोळी (रा.मेहरूण), मो. इद्रिस मो. खलील (रा.कानळदा), अशोक माळी, रमेश पाटील, जगदीश पाटील, 22 जुलै 2022 रोजी कार्यरत असलेले सहाय्यक दुय्यम निबंधक व त्यांचे कार्यालयीन कर्मचारी, जळगाव शहर मंडळ अधिकारी राजेश शंकर भंगाळे, मेहरूण तलाठी राजू कडू बार्‍हे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हवालदार रवींद्र सोनार करीत आहेत.