पुणे। मुस्लिम समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेहरुनिसा हमीद दलवाई यांचं वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 87 वर्षांच्या होत्या. आज सकाळी 11. 30 वाजण्याच्या सुमारास मेहरुनिसा यांनी अखेरचा श्वास घेतला. मेहरूनिसा यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे काम पाहिले. हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च सेंटरच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत्या. ‘मी भरून पावले’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. मेहरुनिसा यांच्या पश्चात रुबिना व ईला या दोन मुली आहेत.
मीद दलवाई हयात असताना त्यांच्या समाज सुधारणेच्या चळवळीत सर्वोतपरी सहकार्य मेहरुन्निसा यांनी केले. हमीद दलवाई यांच्या निधनानंतरही मेहरुन्निसा यांनी मुस्लीम सत्यशोधक मंडळात सक्रीय सहभाग कायम ठेवला. हमीद दलवाई यांच्या निधनानंतर म्हणजे 1977 नंतर मेहरुन्निसा दलवाई यांनी पुण्यात हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्युटची स्थापना करण्यात मोठा पुढाकार घेतला. अशाप्रकारची रिसर्च इन्स्टिट्युट उभारण्याचे हमीद दलावाई यांचे स्वप्न होते. मेहरुन्निसा दलवाई यांची ‘मी भरुन पावले आहे’ ही आत्मकथा प्रकाशित झाली. पुढे याच आत्मकथेचे हिंदीत ‘मैं कृतार्थ हुई’ असा अनुवादही झाला.