मेहरूणमधून एकाच घरातून दोन मोबाईल चोरीला

0

जळगाव । मेहरूण भागातील जय भवानी नगर परीसरात एकाच घरातून मध्यरात्री अज्ञात भामट्याने खिडकीजवळ ठेवलेले दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना पहाटे 3 वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्‍वर भगवान सोनवणे (वय-25) रा. जय भवानी नगर, पाटील शाळेजवळ, मेहरूण हे सुप्रिम कंपनीत कामाला असून या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून भाड्याच्या घरात आईसोबत राहत आहे. नेहमीप्रमाणे रात्री 11 वाजेच्या सुमारास झोपण्यापुर्वी आईचा व स्वतःचा विवो कंपनीचा मोबाईल खिडकीत ठेवून झोपले. मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास खिडकीचा आवाज आल्याने ज्ञानेश्‍वर हे झोपेतून उठले. खिडकीजवळ ठेवलेले विवो कंपनीचा 16 हजार रूपये किंमतीचा आणि 1 हजार रूपये किंमतीचा नोकीया मोबाईल हे दोन्ही मिळून आले नाही. आईला उठवून दोन्ही मोबाईल शोधून मिळाले नाही. तर शेजारी राहत असलेल्या रहिवाश्यांना कोणीतरी अज्ञात व्यक्ती दिसून आल्याचे सांगण्यात आले. चोरट्यास हटकले असता त्याने तेथून पळ काढला होता. ज्ञानेश्‍वर सोनवणे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात भाग 5, गुरनं 183/2018, भादंवि 380 प्रमाणे अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणे अंमलदार सतिष डोलारे करीत आहे.