मेहरूण परिसरातील महिला बेपत्ता

0

जळगाव । शहरातील मेहरुण परिसरात असलेल्या दत्त नगरात राहणारी बावीस वर्षीय विवाहिता संगिता राजू शिरसाठ हि एक मार्च रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास तिच्या एक महिन्याच्या मुलीला घेवून घरुन निघुन गेली आहे.

यावेळी तिचे पती राजू शेनफडू शिरसाठ यांनी आज औद्योगिक वसाहत पोलिस स्थानकात दिलेल्या खबरीवरुन हरविल्याची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक देविदास सुरदास करीत आहेत.