पत्रकार परिषदेत प्राचार्य डॉ.तानसेन जगताप यांची माहिती
चाळीसगाव – महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा चाळीसगावच्या वतीने मेहुणबारे येथे २५ डिसेंबर २०१८ मंगळवार रोजी जिल्हास्तरीय शिवार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेची पुणे शाखा जिल्हा प्रतिनिधी प्राचार्य डॉ.तानसेन जगताप यांनी आज येथे दिली.
यांची होती उपस्थिती
या पत्रकार परिषदेला शिवार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र अमृतकार, शाखा उपाध्यक्ष प्रा.अशोक वाबळे, सदस्य अशोक ब्राह्मणकर उपस्थित होते. २५ डिसेंबर मंगळवार रोजी सकाळी ८.३० वाजता या साहित्य संमेलनाचे उद्घाटन नाशिकचे कवी गीतकार प्रकाश होळकर यांच्याहस्ते तर संमेलनाध्यक्ष कवी उत्तम कोळगावकर (नाशिक) तसेच खासदार ए.टी.नाना पाटील, आमदार उन्मेष पाटील, पं.स.सभापती स्मितल बोरसे, जि.प. मोहिनी गायकवाड, मेहूणबारे लोकनियुक्त सरपंच संघमित्रा चव्हाण, कवी अशोक कोतवाल, प्रा.डॉ.पी जे जोशी, प्राचार्य तानसेन जगताप यांच्या उपस्थितीत होणार आहे.