राज्यातील डिजिटल शाळांचे प्रणेते हर्षल विभांडिक यांच्याहस्ते उद्घाटन
चाळीसगाव — येथील मेहुणबारे परिसरात एकाच दिवशी जिल्हापरिषद शाळा व जिल्हा परिषद उर्दु शाळा चे डिजिटल शाळां मध्ये रूपांतर उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे येथील जिल्हा परिषदेची उर्दु शाळा ही जिल्ह्यात पहिली उर्दु शाळा ठरली आहे.या शाळांचे उद्घाटन राज्यातील डिजिटल शाळांचे प्रणेते हर्षल विभांडिक यांच्या हस्ते झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कोठळे यांची प्रमुख उपस्थिती होती. आधुनिक काळात ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेत मागे राहू नये. यासाठी विशेष उर्दु शाळा सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. हे विद्यार्थ्यांना समजायला सोपे असल्याचे प्रतिपादन यावेळी हर्षल विभांडिक यांनी केले. यावेळी पंचायत समितीच्या सभापती स्मितल बोरसे, गटशिक्षण अधिकारी सचिन परदेशी, सरपंच व पदाधिकारी तसेच युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अक्षय कोठावदे, कार्यकारी अध्यक्ष ऋषीकेश अमृतकार व ग्रामस्थांची उपस्थिती होती. या उपक्रमाचे पालकांमध्ये कौतुक होत असून ही शाळा बघण्यासाठी गावकरी मुले शाळेस भेट देत आहेत.