मेहुणबारे येथे धारदार शस्त्राने गळ्यावर वार करीत प्रौढाची हत्या

Killing an adult by stabbing the neck with a sharp weapon चाळीसगाव : तालुक्यातील मेहुणबारे येथे धारदार शस्त्राचे गळ्यावर सपासप वार करीत 55 वर्षीय प्रौढाची अतिशय क्रुरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवार, 16 डिसेंबर दुपारी एक वाजेच्या सुमारास मेहुणबारे शहरातील गिरणा विद्यालयापासून काही अंतरावर घडली. भर दिवसा झालेल्या खुनाने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. दगडू वामन गढरी (55, मेहुणबारे) असेय मयताचे नाव असल्याची प्राथमिक माहिती असून हत्येचे नेमके कारण व संशयीतांची नावे अद्याप कळू शकली नाहीत.

अतिशय निर्घृणपणे हत्या
राष्ट्रीय महामार्गावरील मेहुणबारे गावातील गिरणा महाविद्यालयापासून काही अंतरावर भर दिवसा अत्यंत क्रुर पद्धत्तीने प्रौढाची हत्या करण्यात आल्याने गावात प्रचंड खळबळ उडाली आहे. आरोपींनी अत्यंत धारदार शस्त्राचा हत्येसाठी वापर केल्याचे उघडकीस आले आहे. खुनाची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक अभयसिंग देशमुख, सहाय्यक निरीक्षक विष्णू आव्हाड व सहकार्‍यांनी धाव घेतली.