ठाणे । शेतात झोपलेल्या एका 92 वर्षीय वयोवृद्ध शेतकर्याची अज्ञातांनी मंगळवारी अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती. मारेकर्याला शोधून काढण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. अवघ्या 24 तासात गुन्हे शाखेच्या कल्याण युनिटने या खुनाचा तपास लावला आहे. अमरजीत सतीराम राजभर (25) असे अटक करण्यात आलेल्या परप्रांतीय आरोपीचे नाव आहे.आरोपी अमरजीत राजभर याने आपल्या मेहुणीच्या लग्नाला लागणार्या पैशांसाठी वृद्ध शेतकर्याची आत्महत्या केल्याचे गुन्हे शाखेच्या प्राथमिक तपासात उघडकीस आणले आहे. 24 तासाच्या आतच गुन्हे शाखेने आरोपीला पकडले. महादेव जाधव यांची चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याची अमरजीतले कबूली दिली. या हत्याकांडात आणखी कुणाचा सहभाग आहे का याची चाचपणी गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहे.
दारू पिण्याचा सांगितला बहाणा
कल्याण-कसारा मार्गावरील आंबिवली स्टेशननजीक यादवनगर येथे शेतात बांधलेल्या घरात मनोहर जाधव हे आपल्या पत्नीसह राहत होते. त्यांची पत्नी एका दुर्धर आजाराने ग्रस्त असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर त्यांची तीन मुले याच गावात राहतात. रात्रीच्या सुमारास पत्नी घरात, तर महादेव हे शेतातील घराच्या व्हरांड्यात झोपले होते. त्यावेळी आरोपी अमरजीत हा दारु पिवून नशेत वृध्द शेतकरी महादेव जाधव यांच्या शेतातील घरी गेला. मृत महादेव जाधव हे दारू विकत असल्याने आपण दारू पिण्यासाठी येथे आले असल्याचे अमरजीतने सांगितले. मात्र अमरजीतचा उद्देश वेगळा असल्याचे लक्षात येताच जाधव यांनी आरोपी अमरजीतला विरोध केला. त्यामुळे दारूच्या नशेत असलेल्या अमरजीतने महादेव जाधव यांच्यावर लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार करून त्यांचा अत्यंत निर्घृणपणे खून केला. त्यानंतर त्याने घरातील पैशाचा गल्ला घेवून पलायन केले.
चोरी करून पळण्याचा केला कट
याच दरम्यान स्थानिक माहितगाराकडून धक्कादायक माहिती उपलब्ध झाली. त्याच परिसरातील लक्ष्मण तरे यांची शेत जमीन असून ही शेती रामप्रसाद राजभर यांनी भाड्याने घेतली आहे. रामप्रसाद यांचा जावई अमरजीत हा या शेतीमध्ये मोलमजूरी करत असतो. अमरजीत याच्या उत्तर प्रदेशातील देसाईगंज येथे राहणार्या मेहुणीचे 23 एप्रिल रोजी लग्न ठरले आहे. या लग्नासाठी लागणारा खर्च करण्याची जबाबदारी अमरजीतने उचलली होती. मात्र मोलमजूरी करणार्या अमरजीतला इतका पैसा आणायचा कोठून हा प्रश्न सतावत होता. महादेव जाधव यांच्याकडे बक्कळ पैसा असणार याची त्याला खात्री पटली होती.