मेहुण्याची हत्या करून पसार झालेल्या आरोपीस सहा वर्षानंतर अटक

0

भुसावळ – नाशिक ग्रामीण हद्दीतील घोटी पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हाकाकोडा येथून नाशिक ग्रामीणसह मुक्ताईनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली. हिंदू कडप्पा भोसले असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीने 2012 मध्ये सख्ख्या बहिणीच्या नवर्‍याचा खून केल्याचा आरोप असून घटनेनंतर तो पसार होत पोलिसांना चकमा देत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आरोपी मंगळवारी मुक्ताईनगर तालुक्यात आल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. बुधवारी सायंकाळी आरोपी कुर्‍हा येथील बाजारात आल्यानंतर त्याच्यावर झडप टाकून त्यास अटक करण्यात आली.