मेहुरुणच्या विवाहितेचा छळ : चौघांविरोधात गुन्हा

जळगाव : शहरातील मेहरूण येथील माहेर असलेल्या 34 वर्षीय विवाहितेचा लग्नात हुंडा कमी दिला म्हणून मारहाण व शिविगाळ करून छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह सासरकडील मंडळींविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
शहरातील मेहरूण येथील माहेर आलेल्या यास्मिनबी असदउल्ला खान (34) यांचा विवाह उसदउल्ला खान हमीदउल्ला खान यांच्याशी 2014 मध्ये रीतीरीवाजानुसार झाला होता मात्र लग्नात हुंडा कमी दिला या कारणावरून वारंवार पैश्यांची मागणी करण्यात आली. विवाहितेच्या आई-वडीलांची परीस्थिती हालाखीची असल्याने पैश्यांची पूर्तता करू शकले नाही तसेच दोन्ही मुलीच झाल्या म्हणून काही ना काही कारणावरून शिविगाळ करण्यात आली तसेच दमदाटी करून छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. याप्रकरणी सोमवार, 14 फेब्रुवारी रोजी विवाहितेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने पती असदउल्लाखान हमीदउल्ला खान, सासरे हमीदउल्ला नसरूल्लाखान, सासू मुमताजबी (सर्व रा. परदेशी गल्ली, एरंडोल) आणि नणंद यास्मीन साजीद शेख (रा.शिरपूर, ता.धुळे) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार महेंद्रसिंग पाटील करीत आहे.