मेहुली घोषने रौप्यपदक तर अपूर्वा चंडेलाने कांस्यपदक पटकाविले

0

गोल्ड कोस्ट :- 21 व्या वेटलिफ्टर्सनी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या मेहुली घोषने १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली आहे. तर याच प्रकारात अपूर्वा चंडेला याने कांस्यपदक पटकाविले आहे. सिंगापूरच्या मार्टिना लिंडसे वेलोसोला मेहुली घोषने कडवी टक्कर दिली होती. मात्र तिचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले.

मेहुलीने शेवटच्या शॉटमध्ये १०.९ गुण पटकावल्याने सामना शूटआऊटमध्ये गेल्याने मेहुलीने ९.९ गुण मिळवले. तर मार्टिनाने १०.३ गुणांची कमाई केली. त्यामुळे मेहुलीला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. मेहुलीने रौप्यपदक विजेती कामगिरी करीत असतांना अपूर्वी चंडेला याने देखील कांस्यपदकावर आपले नाव कोरले. अपूर्वीने एकूण २२५.३ गुणांची कमाई केली. अपूर्वीने पात्रता फेरीत ४३२.२ गुण मिळवले होते. त्यामुळे अपूर्वीने गुणांसह राष्ट्रकुल स्पर्धेत नव्या विक्रमाची नोंद केली. याआधी ४१५.६ गुण ही अपूर्वीची राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी होती.