मेहुल चोक्सीने भारताचे नागरिकत्व सोडले; सरकारला धक्का

0

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या मेहूल चोकसीने भारताचे नागरिकत्व सोडले आहे. त्यामुळे सरकारला मोठा धक्का बसला आहे. चोक्सीने आपला भारतीय पासपोर्ट अँटिग्वा उच्च आयोगात जमा केला आहे. त्यामुळे आता पीएनबी बँक घोटाळा प्रकरणात चोक्सीला भारतात आणणे कठीण झाले आहे.

मेहुल चोक्सीने प्रत्यार्पणाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी भारतीय नागरिकत्व सोडले आहे. याप्रकरणी अँटिग्वा कोर्टात येत्या २२ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने परराष्ट्र मंत्रालय आणि तपास यंत्रणांकडे याप्रकरणाचा प्रगती अहवाल मागवला आहे.