भुसावळ। मुक्ताईनगर तालुक्यातील मेहूण रस्त्याची दयनिय अवस्था झालेली आहे. बीएसएनएलतर्फे जेसीबीद्वारे रस्त्याच्या साईडपट्टीचे खोदकाम केल्यामुळे संपूर्ण रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे डबके झाले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून दुरुस्तीबाबत ग्रामस्थांनी प्रांताधिकारी चिंचकर यांना निवेदन दिले.
प्रशासन दखल घेईना
बीएसएनएलने मेहूण गाव ते मेहूण फाटापर्यंत रस्त्याचे खोदकाम केले आहे. नुकत्याच पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डबके साचले असून ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी चिखलातून वाट तुडवावी लागत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनातर्फे तहसिलदारांना निवेदन देण्यात आले होते. तरीदेखील संबंधितांवर कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे आंदोलन करण्यात आले. मात्र ढिम्म प्रशासन याची दखल घेत नसल्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी भुसावळ येथे प्रांताधिकार्यांना निवेदन दिले आहे. याप्रसंगी संजय निकम, अतुल बोदडे उपस्थित होते.