मे. स्मार्ट कार्ड सोल्युशनमध्ये भारतीय कामगार सेनेची शाखा

0

पुणे: सणसवाडीतील मे. स्मार्ट कार्ड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगारांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी भारतीय कामगार सेनेच्या शाखेचे उद्घाटन 11 सप्टेंबरला करण्यात येणार आहे. त्याची माहिती संघटनेच्यावतीने कंपनीच्या व्यवस्थापनाला एका पत्राद्वारे देण्यात आल्याचे कळवण्यात आले आहे. कामगारांचे आर्थिक व अन्य मुद्यांशी निगडीत महत्त्वाचे प्रश्‍न गेल्या अनेक महिन्यांपासून कंपनीच्या व्यवस्थापनाकडे प्रलंबित आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी भारतीय कामगार सेना काम करणार आहे. कंपनीतील बहुतेक कामगारांनी संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले असल्याचे कळवण्यात आले आहे.