31 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत
जळगाव – मैत्रेय कंपनीमधील गुंतवणुकदारांची रक्कम परत मिळावी यासाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. राज्यभरात मैत्रेय कंपनीच्या फसवूक प्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये ही कार्यवाही करण्यात येत आहे. शहरातील अनेक एजंट तसेच नागरीकांचे मैत्रेय कंपनीकडे पैसे अडकलेले आहे. अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही रक्कम मिळत नसल्याने गुंतवणूकदार हतबल झाले होते. अखेर विविध ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले. तसेच लोकप्रतिनिधींनाही गुतवणूदारांनी रकमेचा परतावासाठी साकडे घातले होते. गुतवणूकदारांचा संघटनेमार्फत मैत्रेयच्या परताव्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आर्थीक गुन्हे शाखेकडे शहरातील गुंतवणूकदारांनी गर्दी केली होती. 31 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात नागरीकांच्या रांगा लागल्या होत्या.