धर्मशाळा । तिसर्या कसोटीत दुखापतीने जायबंदी झालेला कर्णधार विराट कोहली याला चौथ्या कसोटीला या दुखापतीमुळे मुकावे लागले.मात्र तो खेळाडू काय जो मैदानात असतांना स्वस्थ बसत नाही तो मैदानाबाहेर असतांना स्वस्थ कसा बसेल.त्याची खेळाडूवृत्ती त्याला स्वस्थ बसू देत नाही म्हणून तो संघाचा 12 वा खेळाडू झाला असल्याने आपल्या संघ सहकार्यांसाठी चक्क पाणी घेऊन मैदानात आला. यामुळे त्याच्या खेळाडूवृत्तीचे कौतून होत आहे.जेव्हा तो पाणी घेवून आला त्यावेळेस आपल्या सहकार्यांशी संवाद सुध्दा साधला.याचबरोबर पहिला सेशन संपल्यावर सर्व खेळाडूचे स्वागत करण्यासाठी तो डेसिंगरूमच्या बाहेर येवून त्याच्यासाठी टाळ्या वजविल्या.
बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथी कसोटी धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएन स्टेडियमवर खेळली जात आहे. या कसोटीत भारताचा कर्णधार विराट कोहली हा दुखापतीमुळे संघा बाहेर आहे.कोहलीला मैदानात बघता येणार नाही असे प्रेक्षकांना वाटत असतांना त्याने आपल्या चाहत्यांना निराश केले नाही. काही क्षणासाठी का होईना पण तो मैदानात आला.तो ही चक्क 12 खेळाडू म्हणून मैदानातील सहकार्र्यांना पाणी घेऊन आला होता.सामना सुरु झाल्याच्या तासाभरानंतर ड्रिंक ब्रेकदरम्यान कोहली पाणी घेऊन मैदानात आला होता. मैदानात आल्यावर त्याने टीममधील सहकार्यांशी संवादही साधला. 12 वा खेळाडू म्हणून पाणी आणण्याच्या कामाचाही कोहली आनंद घेताना दिसत होता. खेळाडूंसोबत तो थट्टामस्करी करतानाही दिसत होता. कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धूरा सोपवण्यात आली आहे.रहाणेच्या नेतृत्वाची झलक फलंदाजीतसुद्धा दिसू शकेल. कोहलीची आक्रमकता जरी त्याच्यात नसली तरी महेंद्रसिंग धोनीच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचा पुरेसा अनुभव असलेला रहाणे स्वत:च्या नेतृत्वाची एक उत्तम रणनीती जपणारा आहे. कोहलीच्या जागी कुलदीप यादव या डावखुर्या फिरकी गोलंदाजाला संघात स्थान मिळाले आहे. रांचीत झालेल्या तिसर्या कसोटीत कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती.