मॉडर्न हायस्कूलमध्ये स्काऊट गाईड शिबिर उत्साहात

0

नियोजित बंधुता रॅलीमध्ये पथक सहभागी

निगडी : -येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये स्काऊट गाईड पथकाचे एक दिवसीय शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराचे पुणे जिल्हा गाईड सहाय्यक आयुक्त मिनाक्षी मेरूकर, अनघा दिवाकर, जिल्हा स्काऊट प्रशिक्षण आयुक्त रफेल जॉन, प्रशालेचे मुख्याध्यापक गोकूळ कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना अनेक विषय शिकविण्यात आले. याप्रसंगी नियोजित बंधुता रॅलीमध्ये पथक सहभागी झाले होते.

शालेय परिसर स्वच्छता!
शिबिराच्या प्रथम सत्रात प्रथमोपचार व दोरीच्या गाठीचे प्रशिक्षण देण्यता आले. त्यानंतरच्या सत्रात मनोरंजक बोधपर गीते व टाळ्यांचे प्रकार शिकविण्यात आले. स्वावलंबन व श्रम प्रतिष्ठा या मूल्यांतर्गत शालेय परिसर स्वच्छता करण्यात आली. शिबिराचे सांयकाळ सत्रात देशभक्तीपर गीते, शेकोटी गीते झाली. शिबिरामध्ये 50 विद्यार्थी सहभागी झाले होते. शिबिराचे नियोजन पथकाचे शिक्षक सुजाता ठोंबर व आशा कुंजीर यांनी केले. शाळा समिती अध्यक्ष शरद इनामदार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक गोकूळ कांबळे व पर्यवेक्षिका सुमती पाटसकर यांनी मार्गदर्शन केले. शिबिरासाठी सहकारी मनिषा बोत्रे, गंगाधर सोनवणे, शिवाजी अंबिके, सचिन चव्हाण यांनी सहकार्य केले.