जमा धान्य पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला
निगडी : येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयाने एक मूठ धान्य संकलन हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांमार्फत राबविण्यात आला. या उपक्रमातून जमा झालेले धान्य चिंचवड मधील क्रांतिवीर चाफेकर स्मारक संस्थेच्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुकुलम मधील सर्व उपक्रमांची व विद्यार्थ्यांशी संवाद साधत माहिती घेतली.
संस्थेचे हे कार्य पाहून विद्यार्थी भारावून गेले होते. संस्थेचे प्रमुख ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे उपकार्यवाहक शरद इनामदार, संस्थेच्या सदस्या अमिता किराड, सदस्य राजीव कुटे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत उपक्रमाचे कौतुक केले. प्रभारी प्राचार्य मनोज साठे, प्राध्यापक प्रसन्न चव्हाण, रोहित वाघमारे, नेत्रजा मुळे, रविकिरण काकडे, महेश साळवी, सुदर्शन पवार, सेवक राजेंद्र दुधाने यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.