मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजपा नेत्याची हत्या

0

भोपाळ : मध्य प्रदेशमधील बरवानी जिल्ह्यातील बलवाडी येथे एका भाजपा नेत्याचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. मनोज ठाकरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, मनोज ठाकरे रविवारी 20 जानेवारी रोजी मॉर्निंग वॉकला गेले होते. यादरम्यान, पोलीस स्टेशन परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचे डोके दगडानं ठेचण्यात आले होते. घटनास्थळावरील परिस्थिती पाहता त्यांची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. मनोज ठाकरे यांची हत्या कोणत्या कारणामुळे झाली याचा तपास पोलीस करत आहेत.