मोंढाळा येथील तरुणाचा कोळसेवाडी येथे संशयास्पद मृत्यू

0
नातेवाईकांनी व्यक्त केला खुनाचा संशय; संशयीत आरोपींची नावे दिली पोलीसांना 
भुसावळ- तालुक्यातील मोंढाळा येथील मयुर एकनाथ डोळसे (21) हा युवक मुंबई येथे पश्‍चिम रेल्वे लोअर परेल येथे आयटीआय नंतर प्रशिक्षणासाठी गेला होता. मात्र 8 पासून गायब झाल्यानंतर त्याचा मृतदेहच मिळून आला. कोळसेवाडी येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांनी मात्र त्याचा खून झाल्याचा आरोप केला असून पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. दरम्यान शवविच्छेदनाच्या अहवालानंतर खरा प्रकार लक्षात येईल, असे नातेवाईकांना सांगण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान मोंढाळा येथे 16 रोजी शोकाकुल वातावरणात तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.