मोंढाळेत पैशांच्या वादातून पिता-पूत्राचे डोके फोडले

0

दोघा आरोपींना अटक ; कापसाचे पैसे मागण्यावरून वाद

भुसावळ- तालुक्यातील मोंढाळे येथे कापसाचे पैसे मागण्यावरून झालेल्या वादानंतर तिघा आरोपींनी पिता-पूत्राला शिवीगाळ करीत काठीने मारहाण करून त्यांचे डोके फोडल्याची घटना सोमवारी सकाळी नऊ वाजता मोंढाळे गावात घडली. या प्रकरणी दोन आरोपींना तालुका पोलिसांनी अटक केली आहे. दीपक प्रमोद ढाके (29, रा.शिंदी) यांच्या फिर्यादीनुसार त्यांचे भाऊ रीतेश प्रमोद ढाके व वडील प्रमोद ढाके हे संशयीत आरोपी राजेंद्र परदेशी यांच्या घरी मोंढाळे येथे गेले त्यांनी राहिलेल्या कापसाच्या उचलचे पैसे मागितले मात्र यावेळी आरोपीने वाद घालत शिवीगाळ करून काठीने मारहाण केली तर प्रदीप व प्रवीण परदेशी यांनीही शिवीगाळ करून मारहाण केली. मारहाणीत पिता-पूत्रांचे डोके फुटले. या प्रकरणी दीपक ढाके यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी राजेंद्र फकिरा परदेशी, प्रदीप रामचंद्र परदेशी व प्रवीण रामचंद्र परदेशी (सर्व रा.मोंढाळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी क्रमांक एक व दोनला अटक करण्यात आली. तपास हवालदार अजय माळी करीत आहेत.