भुसावळ : तालुक्यातील मोंढाळे शिवारातील जंगलात 65 वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळल्या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या जंगलात वाहन जाऊ शकत नसल्याने पोलिसांनी मृतदेह उचलून दोन किमी अंतर पायी कापले. त्यानंतर बैलगाडीने तो मृतदेह मोंढाळे गावात आणला. तेथून माल वाहतुकीच्या रीक्षाने मृतदेह विच्छेदनासाठी जळगावला रवाना करण्यात आला. कोरोनाच्या भीतीने पोलिसांना मदत करण्यास कुणीही पुढे आले नाही. तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.