मोंढाळ्याच्या इसमाचा उष्माघाताने मृत्यू ?

0

भुसावळ : तालुक्यातील मोंढाळा येथील 55 वर्षीय इसमाचा शहरातील डॉक्टर आंबेडकर होस्टेलमागे मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मृतदेह आढळला. यादव सदानंद भिल (55)  असे मयताचे नाव आहे. भिल यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय आहे. बाजारपेठ पोलिसात गणेश शंकर भिल यांनी दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार जयराम खोडपे करीत आहेत.