मोई सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक

0

चिंबळी । मोई विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमनपदी बाळासाहेब किसन गवारी, तर व्हा. चेअरमनपदी आशा चंद्रकांत गवारी यांची निवड बिनविरोध झाली.राजगुरूनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पाडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे. बी. मुलाणी यांनी काम पाहिले तर त्यांना मदत म्हणून संस्थेचे सचिव निलेश देशमुख, चंदन पानसरे यांनी केली. निवडीप्रसंगी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अशोक राक्षे, शांताराम चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

मावळते चेअरमन भगवान साकोरे, व्हा. चेअरमन नवनाथ गवारी, संचालक पाटील गवारी, जीवन येळवंडे, शहाजी कर्पे, वसंत फलके, नामदेव गवारे, चिंतामण रोकडे, लक्ष्मीबाई गवारी या संचालकांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. याप्रसंगी अण्णासाहेब मगर बँकेचे संचालक विजय गवारी, उपतालुका प्रमुख किरण गवारी, तंटामुक्ती उपअध्यक्ष संतोष येळवंडे, उद्योजक अविनाश गवारी, नितीन गवारी आदी मान्यवर उपस्थित होते.