जळगाव – शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला असून, आज दिवसभरात 4 जणांवर हल्ला करून त्यांचे लचके तोडल्याच्या घटना घडल्या. यात चिमुकल्याचाही समावेश आहे. सर्व जखमींनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. विशेष म्हणजे मागील आठवड्यात डॉग बाइट‘च्या घटनांत वाढ झाली असून, महापालिकेतर्फे कुठलीही प्रतिबंधात्मक कार्यवाही होत नसल्याची नागरिकांची ओरड कायम आहे.
प्रिंपाळा, सुप्रिम कॉलनी, शिवाजीनगर, हरिविठ्ठलनगर, कांचननगर, आसोदा रोड, कासमवाडी आदी भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांत लहान मुले, महिला आदींचा समावेश आहे. यात सोपान रमेश पाटील (वय 35, दोनगांव),मंगला ज्ञानेश्वर पाटील (38,मेहरूण), मनिषा सर्यवल्ली यादव (12, साईनगर), अमृत रमेश ढोले (24,रामेश्वर कॉलनी) यांचा समावेश असून, सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.