मोकाट कुत्र्यांचा धुमाकुळ बंदोबस्ताची मागणी

0

जळगाव। दुध फेडरेशन परिसरासह संतोषी मातानगर, शेरा चौक तसेच मास्टर कॉलनी येथे मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांनी चांगलाच धुमाकुळ घालत दहशत पसरवली आहे. ररस्त्यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांच्या अंगावर धावून जाणे तसेच चावा घेण्याचे प्रकार या ठिकाणी घडत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण परसरले आहे. त्यामुळे या परिसरातील मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त लावण्यात यावा, अशी मागणी अ‍ॅड. युनूस जे. शेख यांच्यासह अ‍ॅड. जैनोदिन आय.शेख यांनी महानगरपालिकेकडे अर्जाद्वारे केली आहे. तसेच डॉग व्हॅनचीही मागणी केली आहे.

या भागाता मोकाट कुत्र्यांचा सुळसळाट
सकाळी मुलास सोडण्यासाठी घराबाहेर आल्यानंतर रस्त्यावर वीस ते पंचवीस मोकाट कुत्रे उभे असतात, त्या रस्त्यावरून गेल्यानंतर कुत्रे अंगावर धावून येतात व चावा घेण्याचा प्रयत्न करतात. यासोबत कुटूंबातील सदस्य सकाळी मोर्निंग वॉकला जात त्यावेळी देखील कुत्र्यांची झुंबड त्यांच्या अंगावर धावून येते. या प्रकारामुळे घराबाहेर निघण्यास देखील भिती वाटते. मोकाट कुत्र्यांनी यापूर्वीही लहान बालकांना चावा घेतला आहे तर बकरी, कोबड्यांचा तर फडश्या पाडला आहे. त्यामुळे संतोषी मातानगर, शेरा चौक, मास्टर कॉलनी परिसरातील मोकाट कुत्र्यांना त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा, अन्यथा काही घटना घडल्यास प्रशासन त्यास जबाबदार असेल असे अ‍ॅड. युनूस जे. शेख यांनी अर्जात म्हटले आहे.

चावा घेतल्याच्या घटनांमध्ये वाढ
दुसर्‍या अर्जात मुलाला शाळेत सोडण्यासाठी दुध फेडरशेन रस्त्यावर स्कुल व्हॅन येते त्या ठिकाणी मुलाला घेवून जातांना कुत्र्यांचे झुंबड त्या ठिकाणी असते व आपआपसात चावाचावी करून धुमाकुळ घालता. कधी-कधी अंगावर धावून येतात. रस्त्यावरून ये-जा करणार्‍या दुचाकीस्वारांच्या मागे कुत्रे पळत सुटतात. कुत्र्यांच्या या दहशतीमुळे मुलगा शाळेत जाण्यासही घाबरत असल्याचे अ‍ॅड. जैनोदिन शेख यांनी अर्जात म्हटले आहे. यात या परिसरातील कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी देखील शेख यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरा मोकाट कुत्र्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होवून चावा घेण्याच्या घटनांमध्येही वाढ झालेली आहे. परंतू प्रशासनातर्फे काहीही उपाययोजन केली जात नसल्याने या घटना वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे महानगरपालिकातर्फे लवकरात लवकर उपायोजना करण्यात याची अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.