मोकाट जनावरांमुळे शहरवासीय हैराण

0

पिंपरी-चिंचवड। शहरातील मोकाट जनावरांच्या उपद्रवामुळे वाहनचालक, नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या, अपघाताला आमंत्रण देणार्‍या आणि त्रासदायक ठरणार्‍या मोकाट जनावरांच्या मालकांवरच फौजदारी गुन्हा दाखल करावी, अशी मागणी थेरगाव येथील संजय गायके यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

याबाबत त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. मोकाट जनावरांना पकडण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. महापालिकेने नेमलेल्या ठेकेदार किंवा कर्मचार्‍यांनी ही पकडली तरी जनावरांचे मालक माफक असलेले शुल्क भरून पकडलेली जनावरे परत नेतात. त्यामुळे या मोकाट जनावरांना सोडवायला कुणी आल्यास ती मोफत सोडून देऊन जनावरांच्या मालकांवरच फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.