ठाणे । वाईन शॉपची रोकड लुटमारी प्रकरणातील व मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे. उल्हासनगर गुन्हे शाखा घटक 4 च्या पोलिसांनी शित अंबरनाथ येथे त्याला जेरबंद करण्यात आले. आशिष देवरे (27) असे अटक गुन्हेगारचे नाव आहे. जुलै महिन्यात दिवा गावातील जयेश वाईन शॉप या दुकानाचे मॅनेजरकडील विक्रीची 11 लाख रुपयांची रोख आरोपीने पळविली होती. या घटनेत त्यावेळी मॅनेजरसह त्याच्या सहकार्यांवर 4 अनोळखी आरोपींनी प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी या गुन्ह्यातील दोघांना यापुर्वी अटक केली होती.
आरोपी मुंब्रा पोलिसांच्या स्वाधीन
पोलिसांनी सापळा रचून शिवाजीनगर परिसरातील चहाच्या टपरीजवळून आशिष देवरे या गुन्हेगाराला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर तो फरार गुन्हेगार असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याला मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास मुंब्रा पोलीस करीत आहेत.
यांनी घेतला सहभाग
या गुन्हयातील 2 आरोपी फरार आरोपीपैकी 1 आरोपी अंबरनाथ येथील शिवाजीनगर भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश बागलकोटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोहर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला अटक करण्यात आली. या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र पवार, यु. आर. पालांडे, आर. एम. सौदागर, पोलीस हवालदार महाशब्दे, संजय माळी आदी कर्मचार्यांनी सहभाग घेतला.