माजी मंत्री एकनाथराव खडसेंचा सरकारवर घणाघात!
नागपूर : माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी एमआयडीसी भूखंडाच्या सरकारवर पुन्हा एकदा घणाघात केला. मोक्याच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी एमआयडीसीचे आरक्षण वगळले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनेचे आमदार अतुल सावे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रा एमआयडीसी इथल्या जमिनीचे सर्वेक्षण न करताच भूसंपादन केल्याचा मुद्दा सावे यांनी मांडला होता. यावर सभागृहात चर्चा झाली असताना, खडसे यांनी सरकारच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली.
हे देखील वाचा
अनेक मोक्याच्या जागांचे उद्योगासाठी विशेष क्षेत्रासाठी आरक्षण करायचे त्यानंतर त्या जागेच्या किमती वाढल्या नंतर त्या जागांवरील आरक्षण वगळून त्या जागा बिल्डरांच्या घशात घालायच्या असे धोरण सुरू असल्याचा आरोप खडसे यांनी यावेळी केला. सावे यांनी दाखल केलेल्या लक्षवेधीत शेंद्रा एमआयडीसीमध्ये उद्योगाच्या ऐवजी मौजे जयपूर येथल्या डोंगराळ भागाची निवड करण्यात आली. त्या ठिकाणी २१५ हेक्टर जमीन अधिकारी आणि विकासकांच्या संगनमताने संपादित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. यावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की, मौजे जयपूर इथली जमीन नियोजित समृद्धी मार्गाच्या लगत असल्याने भुनिवड समितीने याची निवड केली होती. यासंदर्भात उच्चधिकार समितीने याला मंजुरी दिली होती. औद्योगिक वसाहतीसाठी प्राकृतिक दृष्टीने आणि आर्थिक दृष्ट्या योग्य आहे का? हे तपासून सदर भाग वगळून उर्वरित भागास औद्योगिक मानायला देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार ११.३३ हेक्टर हे खाजगी क्षेत्र वगळून एमआयडीसीकडे वर्ग करण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले.
खडसे यांचे या उत्तराने समाधान झाले नाही. अनेक भागात गरज नसताना जमिनीचे संपादन करायचे ,तसेच त्यानंतर आपल्या सोयी नुसार जवळच्या बिल्डरच्या घशात जमिनी घालायच्या हा उदयीग सुरू असल्याचे खडसे यांनी म्हटले. दरम्यान शेंद्रा एमआयडीसीतील जमिनीचे संपादन हे २००० साली करण्यात आले आहे. सादर औद्योगिक क्षेत्रात १०४६ भूखंड करण्यात आले असून १०२० भूखंड उद्योजकांना देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत २६ भूखंड शिल्लक आहेत.शिल्लक भूखंडांपैकी विशेष आर्थिक क्षेत्रामधून विना अधिसूचित क्षेत्रामध्ये १९ भूखंड आहेत. तसेच सेझ मध्ये केवळ सात भूखंड आहेत.ते भूखंड केवळ एक्स्पोर्ट करणाऱ्या कंपन्यांसाठी वाटपाचे धिरण असून अश्या तिकडे कोणताही भूखंड शिल्लक नसल्याची माहिती देसाई यांनी दिली.
